INDEPENDENCE DAY

१५ ऑगस्ट

माझा देश महान

सडा पडला मृतदेहांचा

तरुणांनी तरुणपण दिले

इच्छा आकांशांवर पाणी सोडले

मातृभूमीला प्रेयसी मानले

अन् तिच्या रक्षणार्थ विस्मरण पत्करले

तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला!


"आज १५ ऑगस्ट",आज आपला ७४ वा स्वातंत्र्यदिन,आजही वीरांचे बलिदान आठवले की माना उंचावतात,ज्या देशात २०० वर्ष इंग्रजांनी राज्य केले,स्वतःच्या भारत देशात, "भारत माता की जय",बोल्यानंतर शिरच्छेद केले गेले,आपला धर्म,आपली संस्कृती ची फज्जा उडविण्यात आली,आपल्याच देशात बाहेरून आलेल्या व्यक्तींकडून अत्यंत तुच्छ दर्जाची वागणूक भेटली.अजून अशी किती तरी उदाहरणे आहेत जे आपल्याला दाखवतात की किती सहन केले असेल आपल्या पूर्वजांनी, १८५८ साला पासून इंग्रजांनी भारतावर स्वतःचा ताबा जमवला, आपल्या वर कोणी ५ मिनिटे जरी आवाज चढवून बोललं की आपला राग आपल्या मस्तकात जातो, पण विचार करून पण अंगावर शहारे येतात की कशी कळ काढली असेल पूर्वीच्या लोकांनी. मंदिरे आपली आणि नियम इंग्रजांचे, भारतीयांना हमाल बनवून ठेवले होते त्या काळी, तरी ही समाजात असे काही पुरुष आणि स्त्रिया होत्या ज्यांनी सर्व पिढीत भारतीयांची विचार करण्याची पद्धत बदलून टाकली, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य विर सावरकर, भगत सिंह, मंगल पांडे, ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले , राणी लक्ष्मीबाई, कमला नेहरू आणि अशी अनेक नावे आणि त्यांचे कर्तृत्व आभाळाला फाडून बाहेर निघतील अशे आहे, या सगळ्या लढ्या नंतर २०० वर्षांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रज भारत सोडून गेले, त्यांचा अत्याचार ,कर, दादागिरी देखील नाहीशी झाली,१९४७ नंतरच्या भारताचे चित्र फार फार बदलून गेले, तेव्हा पासून आत्तापर्यंत भारताने खूप चांगले आणि वाईट काळ एकत्र बघितले , भारताने जगाला शून्य पासून ते मंगळयान पर्यंत सगळे काही दिले आहे, मानवाने प्रगती केली,मुली शिकायला लागल्या आणि आज २०२० मध्ये भारत हा मोठमोठ्या देशांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे, तंत्रज्ञान वापरून मोठे मोठे प्रकल्प पूर्ण केले, आज भारत हा किती ही तंत्रस्नेही झालेला असला तरी आज प्रत्येक कोपऱ्या मध्ये १५ ऑगस्ट हा स्वतंत्र दिवस साजरा केला जातो, शाळा आणि महाविद्यालातर्फे कार्यक्रमांचे नियोजन केले जाते, कचेरी मध्ये ,आणि विविध ठिकाणी झेंडा वंदन करून,राष्ट्रीय गीेत गाऊन आपण देशाला आणि वीरांना मानवंदना देतो, शत्रुसोबत लढताना भारत मातेचे वीर पुत्र हे शहीद होतात, त्यांच्या आठवणीत दिल्ली मध्ये खूप मोठे कार्यक्रम असते, जग किती ही पुढे गेलं तरी आपली भारत बद्द्दल ची भावना कधी ही संपत नाही, अनेक सामाजिक संस्था या १५ ऑगस्ट ला गरीब मुलं मुलीनं मध्ये पुस्तक , कपडे , खाऊ च वाटप करतात, अशा प्रकारे स्वातंत्र्य दिवसाची अभिमान कारक आठवण आपण आपल्या हृदयात ठेवतो आणि भारत मातेचे आदर करण्याचे वाचन देतो,

पण मित्रांनो,खरंच आपण आपल्या देशाचा तेवढा आदर करतो का रे? आपला आदर आणि सन्मान हा फक्त स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिवस पुरताच असतो का? एक देश म्हणून आज आपण स्वतंत्र आहोत, आपल्या देशात लोकशाही आहे , लोकांना बोलण्याचा अधिकार आहे , पण आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे " उचलली जीभ लावली टाळ्याला" म्हणजे परमेश्वराने जीभ दिली आहे म्हणून आपण त्याचा गैरवापर करतो आहोत का? तो गैरवापर आपण कधी कधी आपल्या देशा विरूध्द बोलण्यात करतो, जेव्हा आपण विचारांनी, आचारांनी , बुद्धी नी, सामाजिक हुशारी नी आपण स्वतंत्र होऊ तेव्हाच आपण बोलू शकतो की आपण स्वतंत्र आहोत,  भारताचे अशे किती गोष्टी सांगाव्या, लिहिता येणार नाही आणि व्यक्त देखील करता येणार नाही, पण भारत मातेचे, धरती चे आदर करता येईल, फक्त आजच्या पुरते नाही तर शेवटच्या श्वासा पर्यंत फक्त आणि फक्त देशा साठी जगा आणि मरण आल्यानंतर भारत मातेच्या कुशीत अभिमानाने झोपा


 देश म्हणून नाही तर माझी माय ,माता म्हणून प्रेम करा

 स्वतःसाठी नाही तर जन्मभूमी साठी लढा

 आयुष्य छोटे असले तरी, देशा साठी जगा

 देशाचा आदर प्रत्येक क्षणाला करा |

 आणि बघता बघता तो दिवस नक्की येईल जेव्हा आपण खरेखुरे स्वतंत्र होऊ.

 

     भारत माता की जय

        वंदे मातरम्


 THANK YOU 
🇮🇳JAI HIND🇮🇳


Written by :- VAISHNAVI VILAS JADHAV 

Post a Comment

0 Comments